Tuesday, July 23, 2024

*शिक्षण सप्ताह विशेष* 

राज्यातील सर्व शाळांमधून आजच्या शिक्षण सप्ताहच्या पहिल्या दिवसाला उत्तम प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी आजच्या दिवसाच्या नियोजनानुसारच्या  उपक्रमांमध्ये  सक्रीय सहभाग नोंदविला आहे.

याच अनुषंगाने राज्यस्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत उद्या दिनांक २३/०७/२०२४ रोजी शिक्षण सप्ताहाचा दुसरा दिवस म्हणजेच *पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN)* वर आधारित दिवस असल्याने सकाळी ११:०० वाजता *पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN)* या विषयावर तज्ञांच्या वेबिनार सत्राचे आयोजन ऑनलाईन स्वरूपामध्ये करण्यात आलेले आहे. सदरच्या सत्राची

तरी सदरच्या लिंक वर क्लिक करून आपण सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सदरच्या सत्राचे प्रक्षेपण दाखविण्यात यावे. तसेच उद्याच्या नियोजित उपक्रमांचे देखील शाळांमध्ये आयोजन करण्यात यावे. *या सर्व उपक्रमांचे फोटो आपणांस यथावकाश उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या लिंक सोबतच  सद्यस्थितीत विविध समाजमाध्यमांवर जसे - फेसबुक, इन्स्टाग्राम,ट्वीटर इत्यादी वर शेअर करत* असताना  *#ShikshaSaptah  #NEP2020 #PMSHRI #FoundationalLiteracy&Numeracy #Scertmaharashtra* या हॅशटॅगचा वापर करावा.

याचबरोबर FLN वरील काही चित्रफितींच्या लिंक खालीलप्रमाणे :- 





सर्वांना शिक्षण सप्ताहाच्या द्वितीय दिवसासाठी शुभेच्छा!

*राहूल रेखावार (भा. प्र. से.)*
*संचालक* 
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.*

No comments:

Post a Comment