दि..७ जुलै २०२०  वार - मंगळवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- ८५)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

     शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत  या कालावधीत आपल्या अभ्यासासाठी आम्ही विविध मार्ग अवलंबणार आहोत.

यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक मार्ग ...

शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष पाठ्यांश सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी उजळणी व विविध कृती व उपक्रम आपण देत आहोत. 
हे उपक्रम सर्व विद्यार्थी कृती करून पाहू शकतात आणि त्याचा आनंद घेऊ शकतात. 

या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास!
    
ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.


दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिक्षक मित्रांपर्यंत, शाळांपर्यंत  जीवन शिक्षण चा छापील अंक उशिर होत असल्याने या लिंक वर आपणास ई जीवन शिक्षण मासिक उपलब्ध करून देण्यात येत आहे.

जून 2020 चा अंक देखील येथेच प्रकाशित करण्यात आला आहे.


केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या चिकित्सक विचार कौशल्य आणि समस्या निराकरण कौशल्य विकासासाठी अनुक्रमे Cogito आणि The Question Book ही दोन पुस्तके प्रकाशित केली असून या पुस्तकांच्या PDF फाईल्स खालील लिंक्सवर उपलब्ध आहेत. माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.
Cogito

The Questuon Book

कोरोना योद्धा

ओरिगामी
सोप्या पद्धतीने बनवा छत्री भाग २

अवांतर वाचन 
आजच्या पुस्तकाचे नाव : छोटा राजकुमार

चित्रकला/हस्तकला
कासव

आरोग्य आणि सुरक्षा
स्वच्छतादूत

संगणक विज्ञान
कोरल ड्रॉ - भौमितिक आकारात इमेजचा वापर

संगीत/नाटक
तबला - मूलभूत बोलांचा सराव

मजेत शिकूया विज्ञान
Pecking Sparrow

इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - गणित भाग १
पाठ - अर्थनियोजन
घटक - सोडवलेली उदाहरणे

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
विषय - भाषा
घटक - सामान्य ज्ञान

इयत्ता - ८ वी
विषय - गणित 
घटक - विभाज्यता भाग 1

Stay home, stay safe!

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

No comments:

Post a Comment