Saturday, April 25, 2020



बऱ्हाणपूर, ता. मोर्शी  येथे कोरोना प्रादुर्भाव 
रोखण्यासाठी दुसऱ्यांदा ग्राम आरोग्य सर्वेक्षण

  तालुका मोर्शी अंतर्गत बऱ्हाणपूर या गावात कोरणा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने शासन आदेशानुसार दुसऱ्यांदा बऱ्हाणपूर गावाचे दिनांक २२ व २३ एप्रिल २०२० ला आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले. पहिले आरोग्य सर्वेक्षण दिनांक ५ व ६ एप्रिल २०२० ला पूर्ण करून संपूर्ण गावाची आजार व आजाराची लक्षणे इत्यादी आरोग्याविषयी माहिती संकलित करून नागरिकांना सुरक्षित राहण्याबाबत व काळजी घेण्याची सूचना देण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे गावात बाहेर ठिकाणाहून आलेल्या लोकांना अधिक दक्षता घेण्याबाबत सूचना देऊन त्यांची प्राथमिक आरोग्य केंद्र विचोरी, तालुका मोर्शी मार्फत तीन वेळा आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांची प्रकृती  आता उत्तम आहे. पहिल्या सर्वे नंतर पुन्हा दिनांक २२ व २३ एप्रिल २०२० ला १७ दिवसानंतर पुन्हा बऱ्हाणपूर गावाचा आरोग्य सर्वे करण्यात आला. ग्राम आरोग्य दक्षता समिती बऱ्हाणपूर चे सदस्य मुख्याध्यापक निलेशकुमार इंगोले, आशावर्कर श्रीमती ज्योतीताई खुळे, अंगणवाडी सेविका सौ. विमलताई ढगे यांच्यामार्फत सर्वे करण्यात आला. या सर्वेत प्रत्येक घरी भेट देऊन प्रत्येक कुटुंबाची आरोग्याबाबत विचारणा करून आजाराची लक्षणे असल्यास कुटुंबातील सदस्यांची नोंद करण्यात आली.
आरोग्य सर्वे करतांना मुख्याध्यापक निलेशकुमार इंगोले, 
आशावर्कर श्रीमती ज्योतीताई खुळे, अंगणवाडी सेविका सौ. विमलताई ढगे

            तसेच सर्वे दरम्यान सर्व नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. लहान बालके व ज्येष्ठ नागरिकांची अधिक काळजी घ्यावी असा संदेश देण्यात आला. हा सर्वे करताना सोशल डीस्टन्सिंग चे पालन करण्यात आले. सर्वे दरम्यान आजार सदृश्य लक्षणे आढळल्यास त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट द्यावी असी सूचना नागरिकांना देण्यात आली. या सर्व्हेनुसार आजार सदृश्य लक्षणांची नोंद घेऊन ज्यामध्ये सर्दी, ताप, खोकला, इत्यादी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र विचोरी, तालुका मोर्शी येथे माहिती पाठविण्यात आली. या आरोग्य सर्वेक्षणाला व सामाजिक जागृती कार्याला पूर्ण करण्यासाठी ग्राम आरोग्य समितीचे सदस्य मुख्याध्यापक निलेशकुमार इंगोले, आशावर्कर श्रीमती ज्योतीताई खुळे, अंगणवाडी सेविका सौ. विमलताई ढगे  यांनी अधिक परिश्रम घेतले.



                    

No comments:

Post a Comment