दि..१६ ऑगस्ट २०२० वार -रविवार
शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १२५)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.
यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
दीक्षा ऍप लिंक
इयत्तेनुसार घटक हवा -मग इयत्तेमध्ये बदल करा
DIKSHA द्वारे आपल्या सर्वांना दर्जेदार ई-साहित्य मिळावे यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. आपल्याला हव्या असलेल्या इयत्तेनुसार ई- घटक हवा असेल तर आपण आपले प्रोफाईल अपडेट करणे आवश्यक आहे. कसे ते सोबतच्या व्हिडिओमध्ये पहा आणि आजच प्रोफाईल अपडेट करा.
आजचा विषय - सहशालेय उपक्रम
आरोग्य आणि सुरक्षा
कोरोना व्हायरस म्हणजे काय?
ओरिगामी
कागदापासून कावळा तयार करणे
अवांतर वाचन
ए... हस ना!
संगीत
बनवा आपली चाल
मजेत शिकूया विज्ञान
बॉटल स्पिनर
संगणक माहिती
बॉर्डर आणि शेडिंग
चित्रकला
बकेट आणि ठोकळा रंगकाम
उपक्रम ५७
आपल्या परिसरात तुम्हाला कोण कोणती फुलं दिसतात? त्यांच्या नावाची यादी करा. तुम्हाला कोणते फूल सर्वात जास्त आवडतं व का? यावर विचार करा व त्या फुलाचे चित्र काढून ते रंगवा.
उपक्रम ५८
एखाद्या व्यक्तीचा अभिमान वाटणे म्हणजे काय? या बद्दल आपल्या पालकांकडून माहिती घ्या. अभिमान वाटणे व गर्विष्ठ असणे यात काय फरक आहे याबद्दल आपल्या पालकांशी, शिक्षकांशी चर्चा करा.
दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
Stay home, stay safe!
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
No comments:
Post a Comment