अभ्यासमाला-३३

दि. १६ मे २०२०  वार- शनिवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-३३)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
     घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
    महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा.
      आपण या अभ्यासमालेत कोरोना योद्धा ही एक  लिंक देत आहोत. या  लिंकवर आपल्याला इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेमध्ये आपल्या नावाचे पुस्तक तयार करून डाऊनलोड करता येईल व वाचता येईल. त्यासाठी आपल्याला या लिंकवर टच केल्यानंतर भाषा निवडावी लागेल. भाषा निवडल्यावर वेबपेज थोडे खाली सरकवले की आपल्याला आपले नाव टाईप करायचे आहे. आपण पुस्तकासाठी जी भाषा निवडली आहे त्या भाषेत आपले नाव टाईप करा. त्यानंतर मुलगा किंवा मुलगी यापैकी आपल्यासाठीचा योग्य पर्याय निवडून थेट डाऊनलोड या पर्यायावर टच केल्यानंतर कोरोना योद्धा म्हणून आपले नाव असलेले एक पुस्तक आपल्या मोबाईलमध्ये पी. डी. एफ. रूपात डाऊनलोड होईल ज्यात कोरोनाविरुद्धच्या लढाईतील एक योद्धा म्हणून तुमची कथा असेल. चला तर मग तयार करूया आपले स्वतःचे कोरोना योद्धा पुस्तक!
     त्याचबरोबर इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती, 10 वी अभ्यासमाला आणि अवांतर वाचनासाठी एक पी.डी.एफ. पुस्तकही दररोज पुरवण्यात येत आहे. गोष्टीच्या पुस्तकाबरोबरच आम्ही प्रथम संस्थेच्या मदतीने मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका ही सुविधा उपलब्ध करून देत आहोत. यासाठी आपल्याकडे इंटरनेट सुविधा असलेला फोन असण्याची आवश्यकता नाही. तर साध्या फोनवरूनसुद्धा ही सुविधा वापरू शकता. त्यासाठी आपल्याला दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एक मिस कॉल द्यावा लागणार आहे. त्यानंतर आपल्याला एक फोन येईल. त्यावर आपण मराठी भाषा निवडण्यासाठी 3 दाबा. मग 5 वर्षांखालील मुलामुलींसाठी गोष्टी ऐकण्यासाठी 1 व  5 वर्षांवरील मुलामुलींसाठी गोष्टी ऐकण्यासाठी 2 दाबा आणि गोष्टींचा आनंद घ्या.
    
     सध्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.


कोरोना योद्धा


मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका
खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या.
08033094243

Storyweaver
जादव आणि जंगलं


अवांतर वाचन
आजच्या पुस्तकाचे नाव : गहू


चित्रकला
यथार्थदर्शन


स्पोकन इंग्लिश
English Speaking Practice


संगणक विज्ञान
थीम बदलणे


संगीत/नाटक
गायन -वादन
केहरवा तालावर आधारित गीत


मजेत शिकूया विज्ञान
Vibrating Brush


इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - विज्ञान व तंत्रज्ञान भाग - १
पाठ - प्रकाशाचे अपवर्तन


शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
प्रथम भाषा व गणित प्रश्नपत्रिका


इयत्ता - ८ वी
प्रथम भाषा व गणित प्रश्नपत्रिका


Stay home, stay safe!

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

No comments:

Post a Comment