अभ्यासमाला-६९

दि. २१ जून २०२०  वार - रविवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-६९)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!

     शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत  या कालावधीत आपल्या अभ्यासासाठी आम्ही विविध मार्ग अवलंबणार आहोत.

यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक मार्ग ...

शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष पाठ्यांश सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी उजळणी व विविध कृती व उपक्रम आपण देत आहोत. 
हे उपक्रम सर्व विद्यार्थी कृती करून पाहू शकतात आणि त्याचा आनंद घेऊ शकतात. 

या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास!
    
ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.


कोरोना योद्धा

मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका
खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व गोष्टीचा आनंद घ्या.
08033094243

सूर्यग्रहण विशेष
आज दि. २१ जून २०२० रोजी महाराष्ट्रात सकाळी १० ते दुपारी १:२७ दरम्यान सूर्यग्रहण दिसणार आहे. त्यानिमित्त सूर्यग्रहण हा विशेष भाग आपणासाठी देत आहोत. (महत्वाची सूचना- सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी किंवा साध्या चष्म्याने पाहू नये. त्यासाठी सूर्यग्रहणाचे चष्मे किंवा काळी एक्सरे फिल्म वापरावी. )

ग्रहण समजून घेऊ

सूर्यग्रहण

योगासने
१) पद्मासन

२) सर्वांगासन

३) पश्चिमोत्तानासन

४) धनुरासन

५) चक्रासन

६) भस्त्रिका प्राणायाम

७) शवासन

इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - गणित भाग १
पाठ -वर्गसमीकरणे
घटक - मुळे दिली असता वर्गसमीकरणे मिळवणे

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
विषय - बुद्धिमत्ता चाचणी
घटक - सम संबंध भाग १

इयत्ता - ८ वी
Subject - English 
Topic - Sentence Formation Part 3

Stay home, stay safe!

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

No comments:

Post a Comment