दि..२० जुलै २०२०  वार - सोमवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- ९८)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

महाराष्ट्र राज्याच्या शालेय     शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.

राज्यातील शाळा कोरोना मुळे बंद असल्या तरी शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून प्रयत्न करण्यात येत आहेत. याचसोबत विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनासोबत स्वयंसेवी संस्था देखील काम करत आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र च्या सहकार्याने एम. के.सी.एल नॉलेज फौंडेशन हि पुण्यातील स्वयंसेवी संस्था DD सह्याद्री वाहिनीवर मोफत स्वरूपात इ. पहिली ते इ.आठवी च्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी “टिलीमिली” ही दैनंदिन मालिका आज सोमवार, दि.२० जुलै २०२० पासून सुरु करत आहे.  या मालिकेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. 

यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
  
दीक्षा ऍप लिंक

दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.

अभ्यासमालेचे वेळापत्रक

सोमवार - मराठी
मंगळवार - परिसर अभ्यास १/विज्ञान
बुधवार - गणित
गुरूवार - परिसर अभ्यास २/इतिहास
शुक्रवार - इंग्रजी
शनिवार - परिसर अभ्यास २/ विज्ञान
रविवार - सहशालेय साहित्य

उपक्रम ३
लॉकडाऊन दरम्यान आपल्या कुटुंबातील सदस्यांनी कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या यावर त्यांच्याशी चर्चा करा.

उपक्रम ४
आपल्या गावात/शहरात तुमचे सर्वात आवडीचे ठिकाण कोणते व का यावर आपल्या पालकांशी/शिक्षकांशी संवाद साधा.

आजचा विषय -मराठी

इयत्ता पहिली
अग्गो बाई, ढग्गो बाई

इयत्ता दुसरी
देवा तुझे किती?

इयत्ता तिसरी
रानवेडी

इयत्ता - चौथी
बोलणारी नदी - लेखन

इयत्ता पाचवी
माय मराठी

इयत्ता सहावी
सायकल म्हणते मी आहे ना

इयत्ता सातवी
जय जय महाराष्ट्र माझा

इयत्ता आठवी
भारत देश महान

इयत्ता नववी
वंद्य वंदे मातरम्

इयत्ता दहावी
जय जय हे भारत देशा

Stay home, stay safe!

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

No comments:

Post a Comment